Scam or fraud: KDMC — kdmc – garbage management

Submitted by: Shailendra65

Complaint Details:
माननीय महोदय,

क. डों . म . पा. कचरा व्य व स्थापन नाचा बोजवारा देवी चौक डोंबिवली पश्चिम
घंटागाडीच्या वेळा जाहीर के ले ल्या नाहीत. जनतेला पोटापाण्यासाठी कामधंद्याला जावे लागते . ते कसेकाय घंटागाडीच्या वेळा पाळणार. यामुळे कामावर वेळेवर हजार झाले नाहीतर कार्यालयातून मेमो मिळणार. याला जबादार कोण ?
क. डों . म . पा लीकेने दिलेल्या कचऱ्याचे डबे सोसायटीच्या गेट जवळून उचलेले जात नाही
स्वच्छते संबंधीचा भ्रमणध्वनी क्रमांक ८१०८२३६३६३ डायल केला तरी कोणीही उचलत नाही .
कचरा रस्त्यावर पडून सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. इथूनच राम मंदिर, मुंब्रा देवी मंदिर आणि जुनी डोंबिवली येथे जाणारे रस्ते मिळतात.
नागरिकांना नाक मुठीत धरून चालावे लागते.
वरील परिस्थिती दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आहे. यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येऊन साथीचे रोग पसरण्यात मदत होते.

वरील सर्व बाबींचा विचार करून योग्य उपाय करावा हि नम्र विनंती .

शैलेन्द्र पाटील (अध्यक्ष)
अनुसुया सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित..
देवी चौक,
डोम्बिवली (पश्चिम)

 

Comments

comments